STORYMIRROR

Kishor Zote

Inspirational

3  

Kishor Zote

Inspirational

शेतकरी (सहाक्षरी)

शेतकरी (सहाक्षरी)

1 min
249

शेतकरी जात

शेती माझा धर्म

शेतात राबणे

हेच माझे कर्म ॥१॥


काळी आई माझी

मीच तिचा लाल

घामाच्या धारेनं

पिकेल हा माल ॥२॥


तिफण पेरणी

बैलजोडी माझी

जगाचा पोशिंदा

अन्नदाते अशी ॥३॥


शेतात एकदा

या काम कराया

सुखाची ती झोप

लागेल तुम्हाला ॥४॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational