मानव वृत्ती
मानव वृत्ती
देवाने तुला बनविले, तू घडवू सर्वांना
स्वाभिमानाचा वापर करून, तू जुडवा सर्वांना
प्रयत्न करून तुम्ही हे जग जिंकू शकाल
तुझ्या ह्या यशाचा वापर करून तू कळव सर्वांना...
देवाने किती कष्ट घेतले ,मानव घडवताना
मानवा ने क्षण लावला नाही ,मानव तुडवताना
तुडवतात तुडवता मानवाने ,मानव असा तुडवला
की देवाला सुद्धा विचार करावा लागला, मानव जुळवताना
आलोय आम्ही आता मानवामध्ये मानववूर्क्ती टाकायला
मानवाला जागृती ची खरी दिशा दाखवायला
मानवाला माणुसकीचा अर्ध समजवायला
आणि मानवाला माणुसकीचा धर्म शिकवायला
मला तर वाटते.....
देवाने व्यर्थ प्रयत्न केला मानव बनवायला..
:-🏆-:-:-:-:-:-🙏:-:-:-:-:-:-:-:-:-📚-:-:-:-:-:-:🥇-:-:-:-:
