Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

TRUPTI PATIL

Inspirational

4.0  

TRUPTI PATIL

Inspirational

जिव्हाळा आपुलकीचा

जिव्हाळा आपुलकीचा

1 min
330


जिव्हाळा नात्यांचा खरा

आपणच जपायचा

संपू नये आपल्यातला 

ठेवा निस्वार्थी मनाचा||१||


आपण सजावं छान

प्रेमाच्या अलंकारानं

सहकार्य,सहिष्णुता

मायेच्या दानानं||२||


ममतेच्या त्या रोपाने

आपुलकी बहरावी

सामंजस्याने नात्यांत 

प्रेमबाग फुलवावी||३||


सोज्वळ, स्वच्छ हृदय

उपेक्षा नको कोणाची

कशास भूक ठेवावी

मानपान,आदराची||४||


नको हेवेदावे, राग

वाईट द्यावे सोडून

नाहीतर पश्चातापच हाती 

नाती जातील मोडून||५||


आत्मचिंतन,मनन

स्वपरीक्षण करावे

नात्यातल्या जिव्हाळ्याला

आत्मज्ञानाने जपावे||६||


Rate this content
Log in