काव्यप्रकाशाची वाट
काव्यप्रकाशाची वाट
1 min
625
मिळे आशेचा किरण
साथ कवितेची मला
अस्तित्वाची जाण झाली
मनी आनंद दाटला||१||
काव्यरुपी गगनात
उंच भरारी घेईन
शब्दबळावरी पूर्ण
जग कवेत घेईन ||२||
काव्यामुळे जीवनात
नव आशा पालवते
किर्ती मिळेल तुजला
यश दिशा खुणवते||३||
काव्यातून मन माझे
असे मुक्त भटकते
सारे मनीचे ते भाव
तिच्यामध्ये साठवते||४||
अंधारल्या जीवनाला
काव्यप्रकाशाची वाट
आता होणार जीवनी
एक सुंदर पहाट||५||
