STORYMIRROR

TRUPTI PATIL

Others

3  

TRUPTI PATIL

Others

बहिणीची माया

बहिणीची माया

1 min
303

 तेजोमय दीपोत्सव

 दिपावली आनंदाची

 ओवाळीते भाऊराया

 भाऊबीज ही प्रेमाची


 नातं भावाचं मैत्रीचं

 अनुबंध प्रेममय

 सावलीच माहेराची

 पित्यापरी स्नेहमय


 भांडणात दडलेल्या

 गमतीची गोडी भारी

 आठवणी भावाच्या त्या

 प्रेमनदी वाहणारी


 मांगल्याचा पावित्र्याचा

 असे भाऊबीज सण

 देवा सर्वच दुःख ते

 कर भावाचे हरण


 आज यमद्वितीयेस

 ओवाळीते भाऊराया

 दीर्घायुष्य भावासाठी

 मागे बहिणीची माया



Rate this content
Log in