संत्र्याच्या गोळीची जादुगिरी(बालकविता )
संत्र्याच्या गोळीची जादुगिरी(बालकविता )
केशरी पिवळ्या
गोळ्या ह्या रंगांच्या
चवीला भारी
आंबट गोडाच्या||१||
गोळ्यांसाठी पैसे
आई मला दे ना
मित्र-मैत्रिणी खाऊ
एक तुला पण घे ना||२||
खरं सांगू आई
भारी मज्जा येते
गोळ्या संत्र्यांच्या खाऊन
मन आनंदी होते||३||
लेमनच्या गोळ्या
किती मनोहर
खेळांच्या स्पर्धेत
त्या आम्हा साथीदार||४||
आई गावाला जाताना
घेशील गोळ्या संत्र्याच्या?
चघळत खाऊ मस्त
खेळत भेंड्या गाण्याच्या||५||
संत्राच्या गोळ्यांची
मज्जाच लय भारी
जिभेवर येताच
कळे तिची जादुगरी||६||