लेकीची करुण विनंती
लेकीची करुण विनंती
मुलगी म्हणून जन्मा आले
माझा जन्म का हो व्यर्थ
आई-बाबा तुम्हीच द्या
माझ्या जीवनाला अर्थ||१||
जगाची तमा का बाळगता
कन्यारत्न मोठे मोलाचे
ठाव घेते अगदी चोख
ती आई बापाच्या मनाचे||२||
वंश मुलगाच का हो?
लेक अनमोल हिरा
आई-बाबा तिच्या अंगी
गुणांचे पैलू पहा जरा||३||
कत्तलखाने बंद करा
गर्भात लेकी नका मारू
आई बाबा सांगा जगा
मुलीला दूर नका सारू ||४||
एकविसाव्या शतकातही
लेकीस दुय्यम ते स्थान
आई-बाबा तुम्हीच मज
जगी मिळवून द्या मान||५||
