रात्र पुनवेची
रात्र पुनवेची
1 min
449
रात्र आज पुनवेची
चंद्र गालात हसला
शरदाच्या चांदण्यात
आसमंत बहरला
शांत शीतल गारवा
कोजागिरी पौर्णिमेचा
जागरण करुनिया
घ्यावा आशिष लक्ष्मीचा
केशराचे दूध गोड
त्यात चंद्रबिंब खास
नात्यातल्या प्रेमामध्ये
विश्वासाचा राहो वास
आनंदाने गावी गाणी
परंपरा भोंडल्याची
खेळ दांडियाचा चाले
साथ असे गरब्याची
हिरकणी ती महान
बाळासाठी व्याकूळली
आज स्मरते सहज
गड कशी उतरली
शुभ्र शरद चांदणं
चंद्र साक्षीला प्रेमाच्या
सदोदीत संसारात
लाटा वाहो आनंदाच्या
