आजही उणीव भासतेय तुझी...
आजही उणीव भासतेय तुझी...


आजही उणीव भासतेय आई तुझी...
आजही तरसतायेत कान माझे
तुझ्या तोंडून शिव्या खाण्यासाठी
आजही आठ्वतायेत शब्द तुझे
मुंगी होऊनि साखर खावी...
नम्रता, शिस्त... या गोष्टी शिकवल्या तू
आजही मनापासून फॉलो करतोय
पण बघायला नाहीये तू...
वडापाव पाणीपुरीच्या ५ रुपयांसाठी...
हट्ट करायचो तुझ्याकडे…
आज खिशात ५00 रुपये जरी असले
तरी तू दिलेले ५ रुपयेच महत्त्वाचे वाटतात...
आज नको तो वडापाव नको ती पाणीपुरी
फक्त तू हवीशी वाटते…
आजारी पडलो तर रात्र रात्र जागायची तू…
स्वतः आजारी असून पण राबराब राबायची...
पण कधी बोलून नाही दाखवले तू…
दुःखाचे कितीही चटके असले तरी…
काही तक्रार न करता सोसायची तू...
वडिलांच्या रागावण्यावर वाचवायची तू...
काही चूक झाली तर स्वतःच्या अंगावर घेऊन
वाचवायची तू...
पण आज चूक नसतानाही बोलणं कोणीही
येऊन काहीही बोलून जातं...
काही आपल्या लोकांनीच परकं केलंय…
जाणीव करून देतात तू नसल्याची...
वागण्यातून बोलण्यातून वेळोवेळी...
अस्तित्वाची किंमत कळते तुझी आज...
आजही उणीव भासतेय आई तुझी...