STORYMIRROR

अक्षय दुधाळ

Abstract Others Children

4  

अक्षय दुधाळ

Abstract Others Children

शाळेचे ते दिवस परत नाही येणार

शाळेचे ते दिवस परत नाही येणार

2 mins
240

शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...

काही रस्ते आम्ही न थकता चालायचो

काही क्षण थांबवून थांबत नाहीत

आठवणी बनला तो प्रत्येक क्षण

शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...


लहानपणी मोठे होणं एक स्वप्न होतं

आणि लहानपणच आठवण झालेली होती

आनंद कशात असतो हे आज कळलय

लहानपण काय होतं ते आज उमगलय

शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...


चिमणी चिमणी पाणी पी हत्ती घोडा नाचू दे

म्हणत पाठीवरच पाणी सुकवणं

पेन्सिलसाठी भांडणं

मैत्रीमधले ते रूसवे फुगवे

बड्डेला नवीन ड्रेस घालून येणं

एकूण काय तर प्रत्येक क्षण आनंदाने जगणं

ते खेळाच्या तासाला ग्राउंडवर खेळणं धडपडणं खरचटणं

ते हारणं जिंकण ते छोट्या छोट्या कारणासाठी भांडणं

असे कित्येक क्षण निसटले ते घर तुटलं ते लहानपण संपलं

खूप प्रेमळ आठवणी देऊन गेलं

ते लहानपण हळूच माझ्या हातून निसटून गेलं

फिरसे मुझे जिने दो जरा फिरसे मुझे स्कूल जाने दो जरा

शाळेचे ते दिवस परत नाही येणार ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract