बोबडे बोल
बोबडे बोल
बाळा आज काय केलंस दिवसभर
सांग बरं पटकन नाही आता धीर
पप्पा पप्पा मी की नाय आज
गेलतो लय लय म्हणजे लय लांब
अरे बापरे लांब, लय लांब
भीती नाही का वाटली
पप्पा मी मोठा झालोय आता
माझी गाडी घेऊन गेलतो घाइंssग घाइंssग
आधी की नाय अशी इकडं
मग तिकडं एकदम फास्ट ब्रूम ब्रूम
अरे एवढी कशी वळणं
गोल गोल फिरत होतास काय
पप्पा तुम्हाला तर कळतंच नाही
गाडी घाटात होती ना म्हणून
पप्पा पप्पा पुढल्या वेळी आपण जाऊ
तू, मी आणि मम्मूडी गाडी मी चालवणार तू घाटात घाबरतो ना?
हो म्हणून मान मी हलवली
तूच चालव बाबा मला नाय जमत तुझ्यासारखं
ऐकताच बोल बाबांचे बाळ गोड हसला
शेवट दिवसाचा नेहमीप्रमाणे गोड झाला
