STORYMIRROR

अक्षय दुधाळ

Classics Inspirational

3  

अक्षय दुधाळ

Classics Inspirational

आई

आई

1 min
254

जिचं प्रेम मोजता येत नाही ती आई

उगवत्या सूर्याची तेज आई

काटेरी वनातल नाजूक फुल आई

पावसाळ्यातली छत्री, थंडीतली शाल,

उन्हाळ्यातली सावली जिच्या पदरात

आहे ती आई पहिला श्वास म्हणजे आई

आयुष्यातील पुस्तकातील पहिले पान आई

घरातल्या घरात गजबजलेल गाव आई

घराचा पाया, मंदिरातील देव आई

समईतून उजेड देणारा धागा आई

मायेचा फटका, जेवणातल मीठ आई

प्रश्नाला पडलेले उत्तर आई

बहिर्याचे कान लंगड्याचा पाय 

वासराची गाय तशी लेकराची माय आई

सरतही नाही आणि पुरतही नाही अशी

जन्माची शिदोरी आई

कवितेची ओळ, गाण्याची चाल आई

आयुष्याच्या मुव्हीची डायरेक्टर आई

जिवंतपणी दिसणारं देवाचं रूप आई 

आत्मा आणि ईश्वर यांचं मिलन आई         


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics