STORYMIRROR

Mrudula Raje

Classics

4  

Mrudula Raje

Classics

रंग पंचमी

रंग पंचमी

1 min
1.1K


रंगात रंगला फाल्गुन, अवघी सृष्टी झाली केशरी।

आकाशाची शाल केशरी, धरती वरी पांघरी॥


पाहून त्यांची प्रीत बावरी, मन झाले केशरी।

तनामनावर वसंत लिंपून, मीही रंगबावरी॥


रंगे भिजली राधा, श्रीरंग उधळी रंग केशरी।

वृंदावन सारे मोहीत होऊन, शोधितसे श्रीहरी॥


एकच रंग उरला भूवरी, प्रीतीरंग केशरी।

गोरी राधा, निलघन श्याम, अद्वैत-रंग धारण करी॥


होळीच्या आनंदे रंगले, चित्त राधा-कृष्णा परी।

प्रेम-रंग चढता मानसी, जगाची पर्वा कोण करी?


मन चंचल, तन अधीर होतसे; पाऊल नर्तन करी।

मुकुंद माझा भेटताच, होईल रंगपंचमी साजरी॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics