STORYMIRROR

Mrudula Raje

Others

4  

Mrudula Raje

Others

शिशीर आगमन

शिशीर आगमन

1 min
400

शिशीर ऋतूतील थंडी आणते , अंगावर शिरशिरी 

मनी दाटते काहूर माझ्या , उठते तनावरी भिरभिरी


हेमंताची वैभवलक्ष्मी सुखवित होती मनामनाला 

धनधान्य अन् समृद्धीचे दान देई ती गृहलक्ष्मीला


ऋतू बदलला,वैभव सरले ; हेमंताची उरली न शोभा 

पानगळीतून दिसू लागली, आकाशाची मलीन आभा 


जीर्ण पर्ण ते उडवून लावीत , धुळीची वादळे उमटली 

कशी धरावी तग हिवाळ्यात , कुशंका मनांमध्ये दाटली 


जीर्ण पर्ण अन् जीर्ण शरीरे,थंडीने अती थकली भागली 

वृक्षराज निष्पर्ण उभा , जणू बहर उतरुनी समाधी घेतली 

 

हा संन्यास म्हणायचे, की सृष्टीची विजयामागून हार ? 

तांडवनृत्य करता शिवशंकर , करिती का विश्वसंहार ? 


हिमालयातील हीम गारठले, गोठली गंगा नदी वाहती 

प्रयाग क्षेत्री ईश्वरास भेटण्या, शीत लाटा आतुर धावती 


प्रार्थना एकच तुम्हा दयाघन , देण्या यावे सृष्टीला जीवन

शिशीरातील थांबवून दुर्दशा , द्यावे सृष्टीस नव संजीवन          


Rate this content
Log in