STORYMIRROR

Mrudula Raje

Others

3  

Mrudula Raje

Others

गृह स्वामिनी

गृह स्वामिनी

1 min
171

साधीसुधी भोळीभाबडी गृहिणी मी माझ्या घरची

भासते मला की मीच स्वामिनी, सम्राज्ञी ह्या राज्याची 


पती माझा भासतो मज राजा, माझ्या छोट्या घरकुलाचा 

लेक लाडका राजपुत्र जो तेजाळतो दिवा मम वंशाचा 


लाडकी सानुली लेक ही माझी, राजकन्या शोभे ह्या राज्याची 

हास्य तिचे गुंजते घरामध्ये, जणू किणकिण घंटा वाजे मंदिराची 


सासूसासरे समंजस, प्रेमळ ; तक्रार कधी नच दोघांची 

अधूनमधून चालत राहते वर्दळ माझ्या दोन दीर-जावांची 


कामाचा नेहमीच धबडगा, अचानक कधी येती पाहुणे घरी 

स्वागताला सदैव तत्पर, सुहास्य वदनाने मी दिसे उभी दारी 


सणवार अन् व्रत-वैकल्ये सांभाळून मी करते सुखी संसार 

पती संगे पिकनिक, पार्ट्या ; ह्यांचा घेई मी आनंद अपार 


जुन्या-नव्याचा सुरेख संगम साधून करते मी सुंदर संसार 

साम्राज्य माझे इथे वसवले , प्रेमाने उघडून मी स्वर्गाचे द्वार 


परमेश्वराचा वरदहस्त लाभे मज, नको अन्य कोणते वरदान 

राज्याला मम नजर न लागो, जरी गाती लोक माझे गुणगान 


Rate this content
Log in