STORYMIRROR

Mrudula Raje

Others

3  

Mrudula Raje

Others

युद्ध नीती

युद्ध नीती

1 min
105

युद्ध पुकारलेत तुम्ही आपापसात द्वेषाने, वैमनस्याने 

काय होती चूक आमची ज्यांना मारलेत तुम्ही त्वेषाने 


कित्येक बालके झाली पोरकी, कित्येक पडली मृत्यूमुखी 

सांगा तुमच्या घरांतही आहेत सर्व का सदासुखी 


महिलांवर केले अत्याचार अगणित, विधवाही किती तरुणी झाल्या 

पती विरहाने कित्येक मेल्या, पित्याविना पोरक्या झाल्या 


आज संपले युद्ध तुमचे, शांती-तह सुद्धा झाला

आणणार प्राण का परतून शरीरी, निर्जीव सैनिकांच्या? बोला !


देशभक्ती आम्हासही प्यारी, नच देश कोणाच्या स्वाधीन करू 

परी युद्धाची नौबत वाजवताना जीवितहानीचा विचार करू


मारलीत तुम्ही माणसे आमची; मायबाप, भाऊ-बहीण गेले 

विसरणार मी न कधी ह्या युद्धाला ज्याने मला पोरके केले 


राष्ट्रप्रेम न माझे दुबळे, हिंमत कधीही न हारणार मी 

परी शत्रूवर चालून जाताना माणुसकी न विसरणार मी 


युद्ध जरी हे आता संपले, विरणार तरी न ह्याच्या खुणा 

एकच प्रार्थना आता देवाला, नच राहावी कोणाच्या मनी घृणा                  


Rate this content
Log in