STORYMIRROR

Shivam Madrewar

Fantasy Children

4  

Shivam Madrewar

Fantasy Children

एक दिवा

एक दिवा

2 mins
313

प्रश्न आहे प्रत्येकाच्या काळजीचा,

लोभ नाही तिला कशाचा,

सोहळा आहे तो जन्मदात्रीचा,

आणि एक दिवा त्या आईचा.


हात मिळाला बाबांना आधार देण्याचा,

तिकीट आहे तिच्याकडे मोज-मस्ती करण्याचा,

हक्क आहे तीला दादासोबत भांडण्याचा,

आणि एक दिवा त्या बहिणीचा.


श्वास घेतला तिने काळ्या मातीच्या सेवेचा,

अंत:करणातून नाश करते ती भुकेचा,

साक्षात रुप आहे ती अन्नपूर्णेचा,

आणि एक दिवा त्या शेतकरीणचा.


पुष्प गुंफला तिने शब्दांचा,

विकास झाला त्या पर्वाचा,

लेखणीने सोडविला मार्ग त्या युध्दाचा,

आणि एक दिवा त्या लेखिकेचा.


वाद आहे विज्ञानाच्या भविष्याचा,

दोष कळाला त्या अंधश्रद्धेचा,

सुटला प्रश्न प्रदूषित वसुंधरेचा,

आणि एक दिवा वैज्ञानीकेचा.


दरवाजा ठोठावला तीने ज्ञानाचा,

संपावला अंधार तीने तीनही घरांचा,

दिपक धरला हाती तीने शिकवणीचा,

आणि एक दिवा त्या शिक्षीकेचा.


शेवट आला आहे जुलमी व्यसनाचा,

तीव्रतेने विरोध केला तिने अन्यायाचा,

ईश्वराने सार्थक केला तिच्या जन्माचा,

आणि एक दिवा त्या प्रत्येक स्त्रीचा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy