जणु राजकुमारीच तू
जणु राजकुमारीच तू
प्रत्येक ठिकाणी माझी नजर कळत-नकळत पणे तुलाच शोधते,
पहाताच तुला त्या क्षणी, माझे निरागस ह्रदय तुझ्यात गुंतते,
आठवण येताच तुझी, कासावीस होतोय अतींद्रिय जीव माझा,
प्रत्यक्षातली जणु राजकुमारीच तू, अन् उशाखाली लपला फोटो तुझा !