काय मुलगी, काय मुलगा
काय मुलगी, काय मुलगा
काय मुलगी, काय मुलगा
**************************
आईच्या गर्भात बाळाचे आयुष्य
आईच्या गर्भात सुरु होते
आई असते बाळाचे सर्वस्व
आई तिची गुरु होते
**************************
ते बाळ आईच्या कुशीत
आईचा स्पर्श ठाऊक असतो
ते बाळ जणू आईच्या प्रेमाला
खूप खूप भावुक असतं
**************************
आई बाळाच्या सुंदर नात्याला
आपण वेगळयाच विचाराने ज़ोडतो
मुलगी असेल का मुलगा
असे भेदभावचे प्रश्न सोडतो
**************************
मिळालेले आयुष्य कुठले ही असो
हस्तक्षेप करणे अधिकार नाही
बाळाचा जन्म कसा असेल
लोकांचे ते प्रश्न स्वीकार नाही
**************************
तो प्रवास , ते प्रेम , ती माया
खऱ्या अर्थाने आईला कळतो
बाळाला प्रथम पाहताच , जन्म होताच
तिच्या मनातील एक अश्रू गळतो
**************************
कौस्तुभ
