STORYMIRROR

Kaustubh Sawant

Others

3  

Kaustubh Sawant

Others

शिरो

शिरो

1 min
191

शिरो

***************************

एक निरागस हडकुळीशी कुत्री

ती जणू कुठे जाते , कुठून येते

सकाळ होताच जणू ती

नियमित आम्हास भेट देते

***************************

तिच्या त्या गोंडुस चेहऱ्यावर

जेवढी भूक तेवढीच मस्ती , किडा आहे

आम्हास विचारले तर नाव " शिरो "

त्रासलेले आयुषाची पिडा आहे

***************************

एका पायाने अधू असली तरी

धावताना खूप चपळ , ज़ोर असतो

जन्म घेताच आई पासून दुरावली

एका नवीन नात्याची डोर आहे

****************************

चाटून खाते सारे काही

बिस्कीट, चपाती, पाणी, अन्य

तिची सेवा करून जसे

आज आम्ही झालो धन्य

****************************

तिचे कान, आमचा आवाज

तिचे डोळे, आमचे चेहरे , चित्र

त्या बागेत योगाने भेटली जणू

आम्हाला आमची नवं मित्र

****************************

कौस्तुभ



Rate this content
Log in