फराळ
फराळ
फराळ
**************************
या त्या दुकानाचा फराळ घेऊन
या त्या घरी फिरवतो
दिवाळीच्या नावाने जणू आपण
फराळ घेऊन नुसते मिरवतो
**************************
पैसे देऊन वेळ वाचला खरं
त्याच बरोबर संपली ती गोडी
आजी , आई , मावशी , मामी, आत्या
फराळासाठी जमलेली त्यांची जोडी
***************************
तासनतास बसून केलेला फराळ
तीच खरी एक पंगत होती
वर्षातून एकदाच का होईना
त्यांची मेहफिल रंगत होती
***************************
स्वबळाने, स्वकष्टावर, हास्य ठेवून
त्या फराळाला मिळाला एक आकार
चकली , करंजी , शेव , शंकरपाळी , लाडू
नाना प्रकारचे पदार्थ झाले साकार
***************************
मनसोक्त बोलायचे तर
ते सर्व या दिवाळीत हरवले
तो फराळ आता जणू नाहीसा
माणसाने म्हणे नवे रीत ठरवले
***************************
येणाऱ्या काही वर्षात तर
घरगुती याला पूर्ण विराम लागेल
पैसे मोजून रीत घेणे
या विचाराने तो वागेल
***************************
हा तर सर्वांचा निजी प्रश्न
जो तो आपलेच ठरवणार
कुणी कुठला फराळ द्यायचा
लोकांना ते काय भरवणार
***************************
कौस्तुभ
