सुट्टीला काम नाही
सुट्टीला काम नाही
सुट्टीला काम नाही
***************************************
माझी सुट्टी, माझी वयक्तिक वेळ
साहेब एकदाच करतो स्पष्ट
मी का म्हणून काम करावे
मी का घ्यावे ते कष्ट
***************************************
नौकरी , पैसा सर्व मान्य आहे
घर चालवायचे एक इंधन असते
एकदाच समजून लक्षात ठेवा
सुट्टीला कामाचे बंधन नसते
**************************************
आज कार्य केले तरी
तुमची वाढती अपेक्षा पुन्हा
सुट्टीच्या दिवशी काम
का करावा असा तो गुन्हा
**************************************
काम पूर्ण होईल खरं
पण आरोग्य, मानसिकता बिघडते
घरची व्यक्ती देखील पाहून
कधी काळजी कधी आमच्याशी झगडते
***************************************
नाही म्हणजे बिलकुल नाही
हा एकच शब्द योग्य बसतो
सुट्टीला काम केल्याने फक्त
काम देणारा लबाडीचे हसतो
***************************************
जे मिळत नसे तो पैसा
जी जाते ती मौल्यवान वेळ
मग हे काम कशासाठी
कुणी सांगितला हा खेळ
असे हे काही क्षण
यात असावे परिवार , मित्र
काम हाती घेऊन आपण
का बदलावा नजारा , चित्र
**************************************
होणारे नुकसान माझे
दुसऱ्याचा तो फायदा
सुट्टीला काम नाही
हाच असावा एकमेव कायदा
*************************************
कौस्तुभ
