त्याचे तोच जाणतो
त्याचे तोच जाणतो
1 min
114
त्याच्या मनात काय
त्याचे तोच जाणतो
योग्य वेळ-काळ आल्यास
तो सर्वच सामोरे आणतो
तोपर्यंत काहीच कळत नसे
सगळेच काही दडलेले
त्याच्या असलेल्या इच्छेनुसार
सर्व काही घडलेले
त्याला असते तुमची काळजी
त्याच्या कृपेवर विश्वास ठेव
तुमच्या नकळत सुद्धा
तुमचे नशीब ठरवतो देव
कुणासाठी विलंब , कुणासाठी लवकर
कुणासाठी कधी काय देतो
तोच तो आपल्या आयुषाचा शिल्पकार
जो आपले नशीब विचारात घेतो
कधीतरी , कुठेतरी, केवहातरी
अनेपक्षित त्याची असते माया
तो दिसेनास असला तरी
आपल्या पाठीशी असतो त्याचा साया
