मुलगी, वंशाचा खरा दिवा
मुलगी, वंशाचा खरा दिवा
मला मुलगा पाहिजे
मला पाहिजे वंशाचा दिवा
का बरं असे विचार
का बरं असा हट्ट हवा
स्त्री जर असेल शक्ती
स्त्री जर असेल प्रकृती
मला मुलगा पाहिजे
का बरं ही विकृती
प्रकृती जर जन्म देते
प्रकृती म्हणजे जर स्त्री
तिला दूर लोटू नका
तिच्यापासून बनतो श्री
जसा मुलगा , तशी मुलगी
त्या दोघांमधेय अंतर काय ?
एवढेच की मुलगी जाते सोडून
सासरी जाण्यास बाहेर पडतात पाय
तिचे जरी नाव बदलले
तिचे जरी गाव बदलले
ती जरी सोडून गेली माहेर
ती असे तेवढीच जिवाभावाची
ती पण असते वंशाचा दिवा
अस्तित्व जरी असेल आपल्या घरा बाहेर
सखी मुलगी असों, काकांची मुलगी असों
किंवा असो इतर कुठल ही नातं
मुलगी देखील असते एक वंशाचा दिवा
मुलगी देखील असते त्या दिव्याची वात
तो काळ इतिहासातच संपला होता
जेथे मुलगी म्हणजे घरची चूल
जेथे मुलगी लग्न करून
फक्त जन्म देणार एखादे मूल
पुन्हा एकदा वाचून पहा
सरोजिनी , राणी लक्ष्मी बाई , सावित्री फुले
किंवा असो महिला शासक रजिया
स्वबळावर स्त्री बदलू शकते दुनिया
आज ही तेवढीच झेप घेतली
आज ही मारली ती मजल
खेळ , अंतराळ , व्यवसाय , सिनेमा
सैन्य , किंवा असो संगीत , गजल
क्षेत्र कुठला ही असो तिचा, तिचे पाऊल
मुलगी ही नवं विचारांची, तिची नवी चाहुल
मुलाने जर दगा केला
मुलाचे जर बदलले लक्षण
तेवहा नात्याची दुसरी बाजू
मुलगीच करेल तुमचे रक्षण
तुमच्या अंगणात असेल मुलगी
तुम्ही आहात खूप नशीबवान
समजा तुम्हाला लाभले भाग्य
तुम्ही आहात खूप बलवान
बोलावे तेवढे कमी आहे
पण एकच सत्य असेल
“मुलगी हीच खरी वंशाचा दिवा”
ही गोष्ट एक प्रकारे नित्य असेल
