STORYMIRROR

Pandit Warade

Children Stories

4  

Pandit Warade

Children Stories

केळी

केळी

1 min
547

गाव सुंदर मामाचा

आहे अति आवडीचा

फळे हिरवी पिवळी

तेथे बगीचा केळीचा।।१।।


पानं सुंदर हिरवी

अंग झाडांचं झाकलं

घडं लागली झाडाला

झाड भारानं वाकलं।।२।।


मामी माझी सुगरण

रोज करी शिकरण

मजा भाचे मंडळींची

होई सुग्रास जेवण।।३।।


चार सवंगडी येती

कधी एकत्र जमून

केळी सर्वांना खायला

मामा देतसे आणून।।४।।


केळी सोलून खायची

साली फेकून द्यायची

पाय पडता मुलांचा

घसरून पडायाची।।५।


Rate this content
Log in