STORYMIRROR

Pandit Warade

Children Stories

4  

Pandit Warade

Children Stories

काव्यात्मक कोडे

काव्यात्मक कोडे

1 min
476


पांढरा शुभ्र माझा रंग

कापसासम मऊ अंग

पाहून मला सारे कसे

अगदीच होतात दंग।।१।।


गुंज जशी लाल लाल

तसे डोळे माझे लाल

माझ्या सवे खेळाया

जमती बाळ गोपाळ।।२।।


आवडते खाद्य माझे

गोकर्णीचा तो पाला

हिरवागार लुसलुशीत

आणि कोवळा कोवळा।।३।।


चाल माझी तुरुतुरु

अंगी फार चपळाई

लागता जरा चाहूल

पळायची खूप घाई।।४।।


ओळखा पाहू कोण

बिळामध्ये मी राहतो

भित्री भागूबाई नाव

कशालाही घाबरतो।।५।।


Rate this content
Log in