STORYMIRROR

Kshitija Pimpale

Children Stories

4  

Kshitija Pimpale

Children Stories

आत्मिक सुख

आत्मिक सुख

1 min
520

खेळू दे ना आई मला

चिखल अन मातीत

मळतील जरा कपडेच ना

दोस्तांच्या संगतीत ....


कागदाचे विमान बनवून

आकाशात उडवू दे

नाव बनवून कागदाची

पावसामध्ये सोडू दे .....


कित्ती मज्जा येईल ना

हे सारं करतांना

पावसाच्या गारांना

हातामध्ये धरतांना .....


पतंगही कधीतरी

उडवू दे ना मला

तु जशी घडली

तस घडू दे ना मला .....


रंगवितांना चित्रे

बोटे बुडवीन मी शाईत

मी तुझा जीव की प्राण

मला नाही का माहीत .....


माझ्यासाठी काळीज तुझ

तिळतिळ तुटते

मला काही होऊ नये

सतत तुला वाटते .....


बागेतल्या पाखरावानी

जेव्हा मुक्त मी खेळेल

आत्मा तुझाही सुखावेल

जेव्हा आनंद मला मिळेल .....


Rate this content
Log in