STORYMIRROR

Kshitija Pimpale

Others

4  

Kshitija Pimpale

Others

आठवणीतला पाऊस

आठवणीतला पाऊस

1 min
489

पाऊस येतांना

उल्हासित मन

गार वा-यासंगे

तुझी आठवण !!


पाऊस येतांना

स्पर्शाचा आल्हाद

वेड लावी जीवा

घालते मी साद !!


पाऊस येतांना

दुर नको जावू

कासाविस जीव

भाव नको खाऊ !!


पाऊस येतांना

मंजुळ स्वरात

आळवते गीत

कोकीळ रानात !!


पाऊस येतांना

नको मज काही

आतूरले डोळे

तुझी वाट पाही !!


पाऊस येतांना

कडाडती ढग

लांब नको जावू

माझ्या बघ !!


पाऊस येतांना

तूला आठवते

तू न आला तर

मनात साठवते !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन