मी
मी
मला ऐकणारीही मीच
अन् सांगणारी ही मीच.
मीच वक्ता मीच श्रोता.
मीच करते तक्रारी अन्
उपाय ही देते मीच मला.
मीच मग होऊन रिलॅक्स
शब्दांच्या सरीत होते चिंब.
मला उरत नाही भान कसलेही.
होते मी माझ्यातच दंग.
मीच मला दाद देते
अगदी मनापासून.
जेव्हा मी बोलते
माझ्याशीच भरभरून.
मला भावते मनापासून
संवाद साधने स्वतःशीच
मी माझ्याशीच हसते
कधीतरी खळखळून
आलेच जर भरून
तर अश्रूही घेते गिळून