STORYMIRROR

Kshitija Pimpale

Romance

4  

Kshitija Pimpale

Romance

मोरपंखी स्पर्श

मोरपंखी स्पर्श

1 min
621

मोरपंखी स्पर्श तुझा

स्वप्नात सख्या मी जाणिला

सत्यात कधी येशील का

हातात हात घेशील का

स्वप्ननगरीत पुन्हा नेशील का

जवळ ओढून घेशील का

प्रितीने चुंबन देशील का.....


ओझरता कटाक्षही

रोमांच फुलवितो देहात या

अंतरी काहूर माजले

आत्मतृप्ती देशील का

सख्या तू येशील का .....


मोकळ्या कुंतलात माझ्या

हळुवार बोटे फिरवूनी

गोडगुलाबी तवस्पर्शाने

मन माझे हर्षित करशील का

बाहुत मजला भरशील का

सख्या तू येशील का .....


ओठांच्या या पाकळ्यांना

मिटुनी घेतले मी जरी

तवअधरांनी चुंबून तयांना

नवसंजीवन देशील का

सख्या तू येशील का....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance