STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Romance

3  

Mrs. Mangla Borkar

Romance

तुझीच वाट बघतेय मी

तुझीच वाट बघतेय मी

1 min
209

प्रेमात तुझ्या पडून सखे,


वाटायचं जीवनात तरलेय मी...!


पण मन तुझ्या ताब्यात देऊन ही,


प्रेमातच अधिक हरलेय मी...!


प्रेमातच पडल्यानंतर वाटायच,


प्रेमामुळे अधिक बहरलेय मी...!


पण प्रेमात पडल्यानंतरच सखे,


तुझ्यासाठी क्षणोक्षणी झुरलेय मी...!


तू माझी जीवनभर साथ द्यावीस,


हीच अपेक्षा करतेय मी. ..!


तुझ्यासाठी खूप तडफडलेय मी,


तुला भेटण्यासाठी सखे धडपडलेय मी...!


प्रेमाच्या वाटेवर येणाऱ्या काट्यांना,


तुडवत तुडवत यायचे मी...!


तुझ्या आठवनींमध्ये सखे,


खूप खूप रडलेय मी ...!


तुझ्या आठवणीसाठी सखे,


स्वतःच्या मनाशी झगडलेय मी...!


हृदय माझं सारखं विचारतय सखे,


कधीतरी माझा विचार करशील तू...?


माझी आयुष्यभर साथ देण्यासाठी,


कधीतरी माझा हात धरशील तू...?


माझ्या मनातील भावनांना अजून सखे,


कुणीतरी मला समजून घ्यावं,


याच आशेन जगतेय मी...!


ती समजून घेणारी तूच असावीस,


यासाठी तुझीच वाट बघतेय मी...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance