STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Others

3  

Mrs. Mangla Borkar

Others

नवी सुरुवात

नवी सुरुवात

1 min
3

मी नवीन वर्षापासून सुरुवात केली 


माझे जगणे होते गाणे सुरेल केंव्हा, 


केंव्हा बेसुर तालावाचून वा तालावर 


कधी तानांची उनाड दंगल झाले सुर दिवाणे


कधी मनाचे कधी जनाचे कधी धनास्तव 


कधी बनाचे कधी घनाशय कधी निराशय


केवळ नादतराणे


आलापींची संथ सुरावळ वा रागांचा संकर


 गोंधळ कधी आर्तता केंव्हा फक्त बहाणे


राईमधले राजस कूजन कधी स्मशाना मधले


क्रन्दन अजाणतेचे अरण्य केंव्हा


केंव्हा शब्द शहाणे


जमले अथवा जमले नाही खेद खंत 


ना उरली काही अदॄश्यातिल 


ओझे फक्त वाहणे


सुत्रावाचून सरली मैफल दिवेही विझले 


सभागॄहातिल कशास होती आणि कुणास्तव


तो जगदीश्वर जाणे


Rate this content
Log in