STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Others

3  

Mrs. Mangla Borkar

Others

आवडता पाऊस

आवडता पाऊस

1 min
3

मनाला हुरहुर लावून देणारा तो पाऊस..


कुणाची तरी आठवण करून


देणारा तो पाऊस..


हळूच अलगद भिजवणारा तो पाऊस..


लहानांपासून मोठय़ांपर्यंत प्रत्येकाला


आवडणारा तो पाऊस!!


कधी धो-धो तर कधी रिमझिम


पडणारा तो पाऊस..


स्वप्नांच्या गावात घेऊन


जाणारा तो पाऊस..


तुझ्या माझ्या आठवणीत


रमणारा तो पाऊस..


चिंब-चिंब भिजवून हरवून


टाकणारा तो पाऊस!!


अबोल असला तरी खूप काही बोलून 


जाणारा तो पाऊस..


मातीला भिजवून सुगंध देऊन


जाणारा तो पाऊस..


भान हरवून टाकणारा तो पाऊस..


हवा-हवासा वाटणारा तो पाऊस!


Rate this content
Log in