STORYMIRROR

SUPRIYA KORE

Romance Others

3  

SUPRIYA KORE

Romance Others

पाऊस तो अन ती

पाऊस तो अन ती

1 min
230

वैशाख वणवा

रणरण ऊन

आतुरले मन  

त्याच्यासाठी ।१।


पावसाची सर

झेले अंगावर

सुख मणभर

लाभतय ।२।


पाऊस तो अन् 

ती धरणी माय

सुखावून जाय

जीव तिचा ।३।


थेंब वळीवाचा

पडे भुईवर

सुगंधी लहर

दरवळे ।४।


अत्तरच जणू

पसरे चौफेर

धुंद क्षणभर

मन होई ।५।


तो पाऊस अन्

ती धरणी माय

तुझ्याविना काय

आहे तिचे ।६।


नाते तुझे तिचे

कसे सांगायचे

शब्द पडायचे

अपुरेच ।७।


यावेस तू अन्

चिंब तिने व्हावे

रंगात नहावे

प्रेमाच्याच । ८।


दोन जीवांचा हा

चालतोय खेळ

दुनियेचा मेळ 

घालण्यास ।९।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance