STORYMIRROR

SUPRIYA KORE

Romance

3  

SUPRIYA KORE

Romance

क्षण आठवणींचे

क्षण आठवणींचे

1 min
220

 *तुझ्या सोबतीत*

क्षण सुखावले

मन हरवले

        साजणा रे ||1||

*सहवास तुझा* 

अत्तराचा फाया

मोहरली काया 

        प्रियतमा ||2||

*वसंत बहर* 

फिका मज वाटे

बोचती न काटे 

        तुझ्यासवे ||3||

*पुनवेचा चांद*

साथीला चांदणी

माझ्या नभांगणी 

         चंद्र तूच ||4||

*या हृदयी त्या हृदयी*

कळे सारे काही

तुजविण नाही

         काही माझे ||4||

*सुख आहे काय*

शोधण्या निघाले

उत्तर मिळाले

        तुझ्यातच ||5||

*जीवनाचे गाणे*

आंनदे गाईन

सूर आळविन

       संगतीने ||6||

*प्रीत तुझी माझी*

आगळी वेगळी

कुणा न कळली

       अद्वितीय ।।7।।

*तुझ्या आठवणी

आनंद सागर

प्रेमाचा बहर

      जन्मोजन्मी ।।8।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance