सरींचे बाण.....
सरींचे बाण.....
सहस्त्र सरींच्या धारदार टोंकाचे बाण टोचून
गेला पाऊस आज पुन्हा जातांना रडवून गेला पाऊस.......
ह्रदयात खोल दडलेल्या जखमा कुरतडून गेला, पाऊस.
कोरड्या डोळ्यांच्या खाचा गच्च भरवूून गेला पाऊस.......
चुक पावसाची कुठली सारी कळ वेदनांची ....
भिजल्या क्षणी डोळ्यांनी दिल्या घेतल्या वचनांची.....
होती साक्ष प्रीतिला आपल्या फक्त या पावसाची......
मज सोडून जातांना आलेल्या कित्येक. प्रलयांची......
दोघांत स्थान सरींना! फिकीर कुठली या जगाची.......
आस फक्त तूझ्या भेटण्यची विसरुन जग, तुजसवे चालण्यची.....
आंणि ओढ तूलाही मजसवे पावसाची........
बेधुंद भिजल्या मिठीला झाडांच्या अडोशाची.
सांग कोठें गेल्या रे शपथा जन्मभर सोबतीच्या,
घेतल्या होत्यास ना!रे तूही सोबतीने याच पावसांच्या ...............
मार्ग होऊनी वेगळे युग किती उलटलेय भासे आतां सारे ... ...
पाऊस पाहतांना खरे खरे सांग !अजुनही मी, आठवते ना रे!!!!

