सृष्टीची शिकवण
सृष्टीची शिकवण
होरपळलेलया ग्रिष्माची
धग चहुकडे रखरखतं ऊन
ऊष्ण वारयाच्या झळा
पानझड मनाला
हुरहुर लावणारी
निळया गर्द आकाशात
तप्त आगीचा पिवळा गोळा
मानवाच्या तुच्छतेची जाण देणारा
चैत्र येई चैतन्य घेऊनी
वंसत बहरतो पानोपानी
हर्ष भराने कोकीळ गाई गाणी
गर्द सोहळा बहरला ॠंतुचा
शीन त्या सवे लोपतो
निराश ऊदास नीरस विचारांचा
निसर्ग सदैव तत्पर श्रेष्ठ निर्माणाला
जीवन धरेवरचे अंश निमिष मात्र ब्रम्हांडाचे
जगणे व्हावे सरळ सोपे
सृष्टीच्या चाकोरीचे
खडतर भेगाळ भुवरी पडतील
थेंब पावसाचे
पसरतील मग गालीचे हिरव्या तृणाचे
सुंदर आहे जगणं
नव्या दिवसाची नवी आव्हाने
नितीमत्तेचे बेगडी मुखवटे सारून
जरा बाजुला सृष्टी च्या नजरेने
पहावे मानसाने मानवाने
