महाराष्ट्राची महीमा मराठी
महाराष्ट्राची महीमा मराठी
सह्याद्रीच्या कडे कपारी वसला महाराष्ट्र
माझा संत वैषणवांचा मेळा
लाभतो वारी कीर्तन भकती च्या रंगात रंगतो
वृक्षवलली सोयरे सांगतो महाराष्ट्र माझा
शिवा जीजाऊ शहाजी शंभूची किर्ती
गातो मर्द मराठा गडयासवे तानाजी सिंह गर्जतो
दरयाखोरयातुन मावळा स्वराज्य रक्षणया
फिरतो धैर्यवान धाडसी हिरकणीचे कौतुक राजा करतो
शूरवीर माता लाभलेला महाराष्ट्र माझा
दिललीचे तकत हिलवितो देशहिताला
प्राधान्य देतो ऊदयोगाची नव्या तंत्रज्ञानाची
कास धरतो कृषी प्रधान, व्यवसाय,
शिक्षण प्रगतीचे बीज रोऊनी जगावर छाप पाडतो
महाराष्ट्र माझा रूढी पंरपराना नडतो
वाइट चालीरीती झुगारतो
स्री शिक्षणाचा पाया रोवतो
अंधश्रद्धा अनिष्ट कुप्रथाना
मातीत गाडुन शाहु फुले आंबेडकराना
सोबत घेऊन
पुरोगामी विचारांचा
प्रसार करतो महाराष्ट्र माझा.....
