चैत्रातली दुपार
चैत्रातली दुपार
चैत्रातली दुपार !
ऊष्ण झळांनी दुख-या
आयुष्याची निराशा वाढविणारी........
जो तो धावत सुटलाय
इथ कुणाला वेळ आहे
आयुष्याचे अर्थ शोधायला!
जीवणाचा गहण विचार
करायला प्रवृत्त करते
चैत्रातली दुपार..........
निळ्या भोर आकाशातून
सुर्य आग ओकतो
माणूस सावलीचा निवारा शोधतो
रणरणत ऊन्ह
ओंजळ भर पाण्याची किंमत ठरवत
जगण्याची, माणसांच्या गरजांची
सरासरी दाखवून देत
चैत्रातल ऊन्ह....................
कंटाळवाणी अस्वस्थता
खोल मनाच्या भावविश्वात डोकावते
दूर दूर खिडकी बाहेरच
लख्ख क्षितीज
ऊजाड माळराण
ओसाड डोंगरानी
आपल्या अस्तित्वाच्या नश्वरतेची
करून दिलेली जाणीव
जगण्याची मस्ती जिरवुन जाते
चैत्रातली दूपार...............
माणुस्! त्याच्या अवाजवी
निरर्थक गरजा
विनामोबदला भरभरून
ऊपभोगणारया आयुष्याची,
या क्षणा पर्यंत जगण्याचे
गहन विश्लेशन
करायला शांतपणे शिकवते
चैत्रातली दुपार............
कोण आहोत आपण?
इथला उद्देश काय
भोवताली जग आहे
मग एकट्यानेच जाण्याचा अर्थ काय आहे
शेवटचा विसावा कीती अंतराचा?
वेध घेऊन प्रश्नांचा
सृजनशीलता जीवणाची
शिकवून जाते
चैत्रातली दुपार..........
