STORYMIRROR

ANJALI Bhalshankar

Action Classics Inspirational

3  

ANJALI Bhalshankar

Action Classics Inspirational

गुढी ऊभारू मानवतेची

गुढी ऊभारू मानवतेची

1 min
219

गुढी उभारू ऐकयाची

समतेची समानतेची नष्ट व्हावी प्रथा  

घृणास्पद विचारांच्या मानसिकतेची

गुढी उभारू सृजणाची सुविचारांची


आत्मभिमानाची समस्त

मानवजातीच्या ऊदधाराची

गुढी उभारू जागृतीची

अंतरमनाच्या ऊदयाची 

सत्यवचन सत्तयाच्या संकल्पनेची


गुढी उभारू क्रांतीची

बदलाची नव्या पंरपरा नव्या वाटेची

बदलूया दिशा निंदनीय

घातक गलिच्छ मेंदुच्या कुविचारांची


गुढी ऊभारू

न्याय हककाच्या जाणिवेने

कणखर खंबीर मनांची


ऊलथून टाकू कुटनिती 

अनिष्ट चाली रीती खोटया

अनगळ थोपलेलया परंपराची


वचने देऊ स्वताःला 

पृथ्वीवर श्वास घेणारया

हरेक मानसाशी

मानुसकीच्या दृष्टीने पाहण्याची

गुढी ऊभारू विज्ञानाची

प्रगतीची जागांच्या

पल्याडची झेप घेणारया स्वप्नांची


भेदून जाऊ सीमारेषा अज्ञान,

निरक्षरता ,अंधश्रद्धा

अनिष्ट अमानविय

मनामनात भिनलेलया

भयान प्राक्तनाची


गूढी ऊभारू तुझी माझी

याची त्याची हिरवी,

केशरी निळी पिवळी नाही

फकत एकच आपली सर्वांची

मानवांच्या कलयाणाची



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action