STORYMIRROR

Vanita Shinde

Action Others

3  

Vanita Shinde

Action Others

स्त्री म्हणजे खेळणे नव्हे

स्त्री म्हणजे खेळणे नव्हे

1 min
25.5K


गर्भात असल्यापासून सुरु

स्त्रीचीच होतेय हेटाळना,

कटपुतली बनवून भावनांची

तिच्या नका करु फेटाळना.


सर्व नाती जपायची तिनेच

तरीही तिला कुठे आहे मान?

अरे हा कोणता न्याय सांगा

स्त्रीलाच देता दुय्यम स्थान!


का करता इतके हेवे दावे?

फक्त तिच्यासाठीच बंधने,

संस्कृतीच्या नावाखाली

का घुसमटली जातात मने?


अजून किती सोसावं तिनंच

किती होणार तिची कुचंबना?

पुरुष प्रधान संस्कृती सोडून

कधी घेणार भरारी ती गगना?


वासनेच्या विखारी नजरांना

का रोखताय स्त्री देहावर,

चंडिका,दुर्गा,भवानी बनून

ती तुटून पडेल तुमच्यावर.


बास झालं आता जीवनात

इतरांच्या कुबड्यांची साथ,

असह्य यातनांनी जीव तिचा

जातो गुदमरुन आतल्या आत.


तिलाही आहे मन भावना

द्या ना स्वातंत्र्य जगायला,

स्त्री म्हणजे खेळणे नव्हे

सर्वांच्या तालावर नाचायला.


माणुस म्हणून जगण्यास तिच्या

अस्तित्वाचा करा ना स्विकार,

बुरसट विचारांची करुन माती

अनिष्ट रुढींचा होऊ दे धिक्कार.


समानतेचा हक्क आहे तिचा

झेप घेऊन स्वप्न साकारेल,

झुगारुन सारी बंधने स्वच्छंदी

स्वातंत्र्याचे ती बंड पुकारेल.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action