STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Action Inspirational Others

4  

Anjali Bhalshankar

Action Inspirational Others

खरचं स्वातंत्र्य आहे का?

खरचं स्वातंत्र्य आहे का?

2 mins
469


खरंच स्वातंत्र्य आहे का इथं

हा प्रश्न लहानपणापासून पडतोय?

एकीकडे मदमस्त सत्ता नव्याकोऱ्या गाडीतून

पांढर्या शुभ्र वस्त्रात राहून सगळे काळे

कर्म करते दुसरीकडे कोण्या शेतकर्‍याची विधवा

सावकाराच्या कर्जापायी फासावर

लटकलेला पतीचा देह पाहून रडते


प्रश्न हाच नाही तेव्हाही पडायचा शाळेत असताना

जेव्हा आडनाव पुकारून शिष्यवृत्तीचे पैसे घ्यायला

पाच सहा जणांना वर्गातून बोलवायचे

पैसे मिळण्याची खुशी होती पण का आली

बाबासाहेबांवर ही वेळ हाडामासाचेच बनलेले

सारे रंग रक्ताचा हि एकच असुनही माणसाला

जगण्यासाठी वेगळी तरतूद देण्याची वेळ


आडाणी आई बापाने शाळेत पाठवले!

त्यांची तगमग म्हणा किंवा तिला हे आम्हालाही वाटल!

आपलं शिकावं पार्ट टाइम जॉब करून कॉलेजही गाठलं

आमचा आमच्या जातीचा झोपडपट्टीत राहणाऱ्यांचा उद्धार व्हायचा,

वर उपदेशाचे डोसही! तुम्ही चांगल्या घरचे दिसताय!

लांब राहा!"तिकडच्यापासुन,सुसंस्कृत म्हणविणारे होते

ते सारे वेदनादायीच होत सारच!


चांगुलपणाची व्याख्या जांतीच्या लेबलावरच का?

ठरते अजुनही मग शाहू फुले आंबेडकर

यांचे कार्य व्यर्थ का ?तेव्हा हा प्रश्न पडायचा


आक्रोषाने उद्रेक करावा वाटायचा

बर्याचदा कामाच्या ठिकाणी!

ॉलेजच्या ग्रुप मध्येही!

अरे मी त्याच जातीची नि झोपडपट्टीतल्या घरात जन्मले!!

भीती वाटायची या स्वातंत्र्य देशात

अतिरेकी स्वातंत्र्य मिळेल एकाकी पणाच !

भय !मी माणुस आहे मला माणसाची गरज आहे!


एकाकी जगण्याला सारवलेय

आता जगाची भीती वाटत नाही

भीती वाटते माझ्यातल्या मानसाची

माझ्याकडुन असे काही घडायला नको

की मी स्वतःच्याच नजरेतून ऊतरेन


दोन शब्द कुण्या पुरुषाची बोलायलाही

कारण या स्वतंत्र देशात एकटीने राहणार्‍या स्त्रीला

संशयाच्या नजरांना उत्तर देण्याचे धैर्य अजूनही नाही

होतं मग तेव्हा प्रश्न पडतो देश

स्वातंत्र्य म्हणजे नक्की कोण स्वतंत्र? 


तसेच साऱ्यांनाच एका तराजुत नाही तोलता येणार आहेत

अजूनही रस्त्यावर उतरून फकत माणसांसाठी झटणारे

घामाच्या मोबदल्यातला वाटा दिलदार मनाने

माणुसकीच्या नात्याने गरजवंताला देणारे ही


पंरतु कोट्यानुकोटी रुपयांचे दान

निर्जीव दगडांच्या मंदिरांना

सोन्याचा मुलामा द्यायला जातं

आणि माझ्या देशाचे भविष्य कुठल्यातरी

पडक्या भिंती च्या गळक्या छताखालील

शाळेत वंदे मातरम म्हणत


तेव्हा नुसता प्रश्नच नाही पडत!

वाटतं माणुस म्हणून हे सारं पहात

जगण्याचा मला खरच!मला हकक आहे का?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action