मी कवी झुरणारा....
मी कवी झुरणारा....
- मी कवी हा झुरणारा वाहणारा आसवे....
- चाललो मी कोण गावी वाट कुठली नाकळे ...
- उगमती जे शब्द मजला भावनांची पाखरे...
- ध्येय त्यांचे उंच तरीही पंख का हे कापरे...
- कधी प्रयत्न फसत जाती संघर्षाचे स्पर्शणयाचे चांदणे...
- काय चुकल्या का मिळाल्या वेदना साऱ्या नव्या... कधी नकोसा त्रस्त वाटे सागराचा तीर तो....
- कधी मनाच्या वेदनांचा आसरा तो वाटतो...
- मी कवी हा झुरणारा वेचणारा शब्द तो....
- तेच घेऊनी धावणारा मुक्त कागद मी असे...
- ना कधी मज कोण बांधे चौकटीचा पिंजरा....
- मावते माझ्या मनी अथांगही मोठी धरा....
- थेंब थेंब मिळता ते पाट वाहू लागती,न्हाऊन ही चिंब का मन माझे कोरडे...
- मी कवी वेड्या मनाचा एक वेड घुंगरू, ऐकताना नाद माझाच हृदय लागे पोखरू....
- मी कवी झुरणारा पेलणारा दुःख ते,वाकलेल्या या कण्याचा मीच वैरी भासतो...
