STORYMIRROR

Anjali Bhalshankar

Tragedy Action Others

4  

Anjali Bhalshankar

Tragedy Action Others

लाईट्स बील अन घराच....

लाईट्स बील अन घराच....

1 min
226

लाईटचे बिल आणि घराचं भाडं, गाढवाच्या रूपात राबतंय घोडं

 मी अन तु, कधी, तू आणी मी, शिजवावा घास तर, घासलेट कमी

 ऊगाचच पेपरात डोक खुपसायचं, कोरड्या विहिरीत पाणी उपसायचं,

भुकेच पोट की की पोटाची भूक जन्माला येऊनच झालीय काय चूक

 झालीच चूक तर भोगा की शिक्षा धडधाकट जीवाला कोणी देईना भीक्षा

 हातपाय धड तर का? मागावी भीक पोट भरायला घाम विक

कोणाच्या पुढ्यात कशाचा खास, मला तर कोरड्या भाकरीची आस

तरीही वेड्या मनाचं मरण, उपाशीपोटी रोजच जागरण,

गोंधळ मांडीला, गोंधळ सारा सरल जीवन श्वास रोखलेला बरा

तरी मी तुला सांगायचो, सांगायचो तुला, नको देऊ एवढी सुखाची स्वप्न तु मला

पुरे आता पुरे,येईल पूर, ढग झाले गोळा, आला पावसाचा इशारा

भिजून गेले अंग सारे भरून आला वेडे नकळत डोळा, 

किर किर रात्र आता वाट नाही पाहणार, बघ काही क्षणातच नवी पहाट होणार......


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy