Anjali Bhalshankar

Abstract

2  

Anjali Bhalshankar

Abstract

आभास.......

आभास.......

1 min
11


गर्दीचा चेहेरा बनुन चालणे अनिवार्यच,लोक खुप भेटतात, "माणसं" सापडत नाहीत,घुसमटलेल्या गर्दीत जीव गुदमरतो, चेहेरे लाखो असतात, क्वचित, अनोळखी एक हास्य श्वास देऊन जाते................


   रखरखीत रूक्ष प्रवासात पाऊलं कोलमडतात,मन थकते बस!थांबावं आता!!तितक्यात, एक सावली कदाचित तुमचीच वाट पहातेय,आभास देणारे, कोणितरी अवचित भेटते वाटसरूच ते!!झटकन मार्ग वेगळे होतात,मात्र पाऊलखुणा हदयात खोल रूजतात कायम........

    

    श्वासासह संघर्ष सुरू असतो ,कधीकधी थकते! शरीर! हाडामांसाचच !नश्वर!

  ..... आणि मन ?घावावर घाव, बसुन तावुन सलाखुन निघालेलं ,अस्तित्वाची परतफेड करताना, परमोच्च सहनशीलतेचा अंत गाठलेलं,निमिशभरात खचतं कोलमडत गहिवरतं... हळवा... आक्रोश... आकांत.... ..........पण,


  .....क्षणात नव्यान ऊभं ठाकत,सावरत, अनंत, अडचणी,समस्यांशी,भीडायला, सार्या जगाशी नडायला का ?कसे?ते.....अश्वाशक शब्द.... नेमक्या वेळी कोणीतरी सहजच उच्चारलेले, कदाचित सहानुभुती म्हणून......?नकळत,चैतन्यमयी संजीवणी देणारे,मोजके शब्द!

  

   मावळतो सुर्य..काही वेळातच जग गुढ अनामिक अंधारात गुडुप! चहुबाजुला काळोख...आणि..... मार्ग,तोच ऐकाकी .....आत दडपलेल्या सागराच्या लाटा पापण्यांच्या काठावरच रोकणारया डोळांनी मुकत व्हावे इतका पराजित हतबल क्षण ,ठाव घेतो दाटलेल्या भोवतालचा ........


तेवढ्यात,


   अनोळखी आभास.....!! भय कसले ? भीती कशाची? वर पहा.....आभाळ खुणावतेय, तुला ..... चांदण्यात भिजवतेय!!!स्वच्छ, नीतळ,शुभ्र चांदणे!!!मग हुरहुर का दाटली मनात? आसक्ती सोड मावळत्या सुर्याची......पहा वाट ऊगवणारया नव्या पहाटेची ................

   

  आपलं असंच सहजचं.गोष्ट गर्दीतल्या "माणसांची" 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract