शब्द
शब्द
त्या भल्यामोठ्या भींतीच्या कडकडेने जतानाच अनेक विचारानी मनाला घेरले कसे असेल भिंतीच्या पलीकडले जग म्हणे मनोरुग्ण !रहातात पलिकडे खरंतर समाजात स्वताला अती शहाणे समजणारे कीतीतरी मानसिकता मजोर असणारी टळकी खुलेआम वावरतात. सुपाऱ्या,दंगली,माणसांची तस्करी करणारे,लाचखोरी संपत्तीची हाव असणारे तो मिळविण्यासाठी भ्रष्टाचार,लाच लबाडी,चोरी गद्दारी करणार्यांचा मेंदू नक्की शाबुत असतो का?लहान लहान लेकरांचे शारीरीक, मानसिक शोषण करणारे उमलत्या कळयांना कुस्करणारया औदासीन्य राजरोस पणे फिरतात याच समाजात स्त्रियांच्या अब्रूशी खेळणारे, पत्नीला निर्जीव संपत्ती समजुन जबरदस्ती करणारे नराधम मानसिक रूग्ण नव्हेत काय?धर्म धर्म करून धर्माचे ठेकदार होऊन,धर्म रक्षणाचा बुरखा पाघरून सामिजिक धार्मिक भावना दुखावणारे,दंगली घडवून समाजात फुट पाडणारे चकचकीत कार्यालयात बसतात महागडया गाडयात फिरतात सभ्यता संस्काराचे ढोंग रचुन लज्जास्पद असंस्कृत असभ्य कृत्य करायला लोकांचा बळी देतात असले लोक खरचं शहाणे असतात का? त्याच धर्माची शिकवण प्रज्ञा, शील करूना,अहिंसा अपरिग्रह, चारित्र्य, समता बंधुता, सर्व धर्म समभाव स्त्रीला माता भगिणी मानुन आदर मान सन्मान जपणारे किती असतात भोवताली?म्हणे समाज कसला समाज,कोणता समाज या नजरेचे वार शब्दाचे हत्यार घेऊनच वावरावे लागते त्याशिवाय मुक्त जगणे नाही.यापेक्षा ती भींतीपलीकडची निरागस दूनिया बरी जिथं माणसिक अपूर्णता आहे विचारक्षमता खुंटली आहे बाहेरच्या जगाशी अनभिज्ञ आहे स्वत्वाचे भान नाही आपापल्या विश्वात दंग आहे मेदूला तान नाही विचारक्षमता बरबटलेली नाही कुटील डाव त्यांच्या मेंदूतून रचले जाणार नाहीत कारण त्यांच्या डोक्यावर परीणाम झालेत असे इथल्या हुषार शहाण्या लोकांचे म्हणने आहे.म्हणून ते मनोरुग्ण बंदिस्त आहेत त्या भींतीपलीकड च्या त्यांच्या विश्वात कैद आहेत त्यांना बरे झाल्याशिवाय सुटका नाही.
