हिवाळ्यातली संध्याकाळ
हिवाळ्यातली संध्याकाळ
थंडीला गुलाबी का म्हणतात ते हिवाळ्यात ल्या संध्याकाळचा गारवा सांगतो
सुर्य सुद्धा आळसावतो जरासा लवकरच पैलतीरावर जातो
तीनीसांजा ऊगवुन येतात क्षिताजावर केशर ऊधळवतात
शहारलेल्या शरीराला कडक चहाची आठवण करून देतात
जुन्या हळव्या आठवणी नव्यान जागवतात.
शुक्रतारा देतो दर्शन मुड असेल तर आकाशातून
चांदण्याही डोकावतात ढगांच्या रजईतुन
दिवस लहान नी रात्र होते मोठी शोधले जातात स्वेटर मफलर नी कानटोपी
हिवाळ्यातली संध्याकाळ गारवा घेऊन येते चौपाटीवर गरमागरम पदार्थाची लज्जत वाढविते
उद्याच्या नव्या पहाटेची स्वप्न पाघरून ऊबदार पांघरूणात शिरते.
