गुलामीचं जगणं
गुलामीचं जगणं
देव, दैव,नशीब,कर्म,
भोग सारे कुटील मेंदुचे खेळ नको,
दवडू अज्ञानात आयुष्याचा अनमोल वेळ.......1
पीढयापीढया सरल्या,
अपुल्या गुलामीच्या अंधारात जागा हो
आता तरी जगं सोडुनिया जात...........2
षंढ दूरजांनी तुला अंधकार दिला
भीमरायाने तुझा उद्धार केला,
ज्ञानसागराने तुला मार्ग दाखविले
नको गमवू संधीचे कर गड्या तु सोने,
सोडून दे आतातरी गुलामिचे जिणे.............4
शोषणाच्या गाळा मध्ये रूतलास
कारे विचारतील जाब तुला पुढच्या पिढ्यारे ...........5
ऊठ विचार जाब व्यवस्थेला,
भग्न होऊन अवकळा का आली
ज्ञानमंदीराला कोटयावधी दान जाई
दगडांच्या मंदिराला,
कसे मिळनार दर्जेदार शिक्षण लेकराला..........6
अंधश्रद्धा, भेदाभेद पाळुन कूठवर जगशील
जातीत जन्मला जातीतच मरशील
नशिबाच्या नावावर ऊभा जन्म तारशिल............7
शोषणाच्या,जखमेसह का तु जाशिल,
आतातरी,जागवं हदयात,क्रांतीचे विचार रूढी,
पंरपरावर घाल असा घाव जाताना
जगातुन पेर बंधुभाव .............8
तुझ्या रोपटयाचा,ऊद्या वटवृक्ष होईल
सावलीत त्याच्या समता विसावा घेईल...............गीत
