STORYMIRROR

Shital Yadav

Tragedy

4  

Shital Yadav

Tragedy

तरही गजल

तरही गजल

1 min
28.6K


मनाच्या गूज गोष्टी शांततेने ऐकते चिंता*

सुखाचा शोध घेण्या जीवनाला पोळते चिंता


कुणाच्या जीवनी अंधार दाटे हा असा काळा

उजेडाला कसे आणायचे ही लागते चिंता


परत आली विराणी आठवांची बरसली दारी

तिला आता कसे थांबावयाचे वाटते चिंता


तुझ्यासाठी अशी ओलावली ही पापणी माझी

कधी येणार भेटीचा दिवस ही बोचते चिंता


नको आधार कोणाचे नको आश्वासने आता

अवास्तव या अपेक्षांनी मनाला जाळते चिंता


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy