मी पाहिलेय....
मी पाहिलेय....
- तू भेटलीस तेव्हा कोमेजल्या फुलाला पुन्हा बहर आलेला मी पाहायलय झर झर धार होऊन मला चिंब भिजवणारा तेच बालिश ढग पुन्हा आकाशात जमून मंद वाऱ्यासह ऐन तारुण्यात माझ्यावर बरसताना मी पाहिलय
- पृथ्वीवरून निरखताना पौर्णिमेच्या चांदण्यांचा लखलखाट तुझ्या मिठीतुन अमावस्येच्या रात्रीलाही मी पाहिलेय
- हिमालयाच्या नदीवरील निस्सीम प्रेम आणि त्या प्रेमापोटी थेंब थेंब विरघळत नदीत मिसळणारे त्याचे विशाल अस्तित्व,अगदी कन्याकुमारीत बसूनही उदास नीरस विरक्त जीवनाला कंटाळलेला माझा आत्मा तू भेटताच मला सोडून गेलेला मी पाहिलय
- खरंच या जीवनावर अन तुझ्यावर अविरत प्रेम करणाऱ्या या, डोळ्यांना मी कितीदा पाहिलेय
- मी पाहिलेय तुला आतुरतेने माझी वाट पाहताना तू तुझ्या घरात असूनही, जागेपणी माझीच स्वप्न पाहताना, अन आरशात पाहून माझे स्वप्न पहात,हळुवार, लाजताना मी, कित्येक दूर असूनही पाहिलेयतुझं माझं सार आपलं होताना मी या डोळ्यांनी पाहिलेय

